वेलतुर ते आंभोरा रोडवरील अपघात टाळण्याकरीता विविध विभागांनी योग्य समन्वय ठेवुन तात्काळ केल्या उपाययोजना

वेलतुर ते आंभोरा रोडवरील अपघात टाळण्याकरीता विविध विभाग व

नागरीकांनी योग्य समन्वय ठेवुन तात्काळ केल्या उपाययोजना

कुही :- कुही ते आंभोरा मार्गावरील वेलतूर स्मशानभूमि लगतच्या वळणावर येणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या नहराजवळ गेल्या आठवड्यात लागोपाठ दोन मोठे अपघात झाले. यात एका अपघातात एका 6 महिन्याच्या चिमुकल्याचा जीव गेला.  तर गेल्या 6 महिन्यात त्याच ठिकाणावर अनेक छोटे मोठे अपघात झाल्याने पुन्हा कुठली अनुचित घटना घडू नये या साठी पोलीस स्टेशन वेलतुर, सार्वजनीक बांधकाम विभाग कुही व पाटबंधारे विभाग कुही, ग्रामपंचायत वेलतुर यांच्या समन्वयातून सदर ठिकाणी भविष्यात अपघात होवु नये याकरीता तात्काळ उपाययोजना केल्या गेल्या आहेत.

तालुक्यात दिवसागणिक पर्यटकांची संख्या वाढतीवर असून आंभोरा येथील  केबल ब्रीज आकर्षनाचे केंद्र ठरत आहे. नागपूर व भंडारा  जिल्ह्यासह विदर्भातील पर्यटकांची हजारोंच्या संख्येत मोठी गर्दी आंभोरा येथे पाहायला मिळते. यात दिवसागणिक नागपूर ते आंभोरा मार्गावर अपघातांची संख्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे .  वेलतुर ते आंभोरा रोडवरील धोकादायक वळणावर असलेल्या पाटबंधारे विभागाचे कॅनॉल वरील पुलावर गेल्या आठवड्यात  दोन गंभीर स्वरूपाचे अपघात झाले होते. तीन दिवसात दोन अपघात एकाच ठिकाणी झाल्याने पोलीस स्टेशन वेलतुर, सार्वजनीक बांधकाम विभाग कुही व पाटबंधारे विभाग कुही, ग्रामपंचायत वेलतुर तसेच वेलतुर येथील सामाजिक कार्यकर्ते अशा सर्वांनी अपघात ठिकाणी प्रत्यक्ष दिनांक २६/१२/२०२४ रोजी भेट देवुन सदर ठिकाणी भविष्यात अपघात होवु नये याकरीता तात्काळ उपाययोजना केल्या. पोलीस स्टेशन वेलतुर तर्फे सदर ठिकाणा पासुन १५० मिटर अंतरावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी योग्य प्रकारे बॅरीकेटींग करण्यात आली. तसेच सार्वजनीक बांधकाम विभागाकडुन अपघात ठिकाणापासुन ५० मिटर अंतरावर रूमलर तसेच अतिरीक्त सुचना- फलक बसविण्यात आले. पाटबंधारे विभागाने पुलावर व पुलाचे जवळ वाहने कॅनॉलमध्ये जावु नये याकरीता ड्रम लावुन त्यामध्ये माती भरून त्यावर रेडीअम लावले. तसेच ग्रामपंचायत वेलतुर यांनी रोडच्या वळणावर असलेली झाडांचे फांदे कापुण सामोरील वाहन स्पष्टपणे दिसतील अशा पध्दतीने नियोजन करण्यात आले. तसेच लवकरात लवकर सदर कालव्यावरील पुलाचे रूंदीकरण पाठबंधारे विभागाने करावे याबाबत पत्र व्यवहार करण्यात आले.