ग्रामपंचायत कार्यकारणीला वर्षगाठ पूर्ण झाल्याने शालेय विद्यार्थांना स्वेटरचे वाटप
कुही :- तालुक्यातील गट ग्रामपंचायत गोठणगाव येथील सरपंच मुकेश मारबते यांचे नेत्रुत्वातील ग्रामपंचायत कार्यकारिणी ला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राम पंचायत गोठणगाव,श्री श्यामाप्रसाद जन-वन विकास समिती गोठणगांव आणि द बांबू फॉरेस्ट नेचर कंजर्वसी यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बांबू फॉरेस्ट चे सर्वेसर्वा सुनील मेहता,व्यवस्थापक अर्जुन भारद्वाज, वनपरिक्षेत्र अधिकारी आरती उके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद नागदेवे, वन समिती अध्यक्ष कैलाश लुचे,मुख्याध्यापक लुचे सर,ग्रामपंचायत चे सरपंच तसेच त्यांचे सर्व सहकारी सदस्य उपस्थित होते.यावेळी सुनीलजी मेहता यांनी शाळेसाठी आवश्यक सर्व सोइसुविधा उपलब्ध करण्यकरिता प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेल्या बीपी आणि शुगर च्या गोळ्यांचा पुरवठा करण्याचे आश्वासन यावेळी दिले.




