राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी महत्त्वाची बातमी; तब्बल 30 लाख महिलांची नावे वगळली
जुलै 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत सरकारने सुमारे 2.5 कोटी लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे सात हप्ते मिळाले आहेत. परंतु यासोबतच सरकार लाभार्थी महिलांची पात्रता देखील तपासत आहे.
मुंबई : महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हफ्याचे पैसे बहुतेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. या योजनेत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. महिलांची मते मिळवण्यासाठी निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत सरकारने बनावट बहिणींवर सुमारे 3000 कोटी रुपये वाया घालवले आहेत, असा दावा केला जात आहे. असे असताना आता तब्बल 30 लाख महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.

राज्यातील सुमारे 30 लाख महिला अपात्र असूनही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या अपात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यात मिळणाऱ्या आठव्या हफ्त्याचे पैसे मिळणार नाहीत. आता 30 लाख महिला या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून बाहेर पडतील. योजनेच्या लाभार्थी महिलांच्या पात्रतेची पुनर्तपासणी केली जात आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने ही योजना जाहीर केली होती. याला प्रतिसादही चांगला मिळताना दिसत आहे.
2.5 कोटी महिलांना मिळाला लाभ
जुलै 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत सरकारने सुमारे 2.5 कोटी लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे सात हप्ते मिळाले आहेत. परंतु यासोबतच सरकार लाभार्थी महिलांची पात्रता देखील तपासत आहे. एकट्या लातूर जिल्ह्यात 25 हजारांहून अधिक लाभार्थी महिलांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 30 लाख अपात्र महिलांची ओळख पटली आहे. या महिलांना आठव्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत, असा दावा महिला व बालकल्याणमधील सूत्रांनी केला आहे.
काही महिलांनी स्वत: नाकारले पैसे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेर पडताळणी करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या माध्यमातून काही अपात्र लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ज्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशा अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही पडताळणी सरसकट केली जाणार नाही, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
सातही हफ्ते झाले खात्यात जमा
मागील महायुती सरकारच्या काळातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली प्रसिद्ध झाली आहे. अनेक महिलांनी त्यासाठी अर्ज केले असून, त्याचे पैसेही खात्यात आले आहेत. असे असताना आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना स्वतः हून नावे कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगण्यात येत आहे.



