वाघाच्या हल्ल्यात गाय ठार; शेतकऱ्याचे ९० हजारांचे नुकसान

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार; शेतकऱ्याचे ९० हजारांचे नुकसान

परीसरात भीतीचे वातावरण 

कुही :- तालुक्यातील पांडेगाव शिवारात वाघाच्या हल्ल्याची घटना उघडकीस आली असून, गावापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असलेल्या शेतात बांधलेल्या गाईवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याचे निदर्शनास आले आहे.

मिताराम रामचंद्र बोरकर हे ३१ जानेवारी रोजी शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास शेतात गेले असता बांधलेली गाय जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोध घेतला असता काही अंतरावर गाय शिकार झालेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे ९० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
वाघाचा संचार गावाजवळ वाढल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य आशिष धणजोडे सह गावकर्यांनी केली आहे.