एकाच रात्रीत खाजगी बँक व ज्वेलरीचे दुकान फोडले
मांढळ नगरीत चोरट्यांचा धुमाकूळ
(सोमेश्वर वैद्य)
मांढळ:- मांढळ शहरात शनिवारी पहाटे चोरट्यांनी निर्मल उज्वल क्रेडीट कॉ. सोसायटी या खासगी बँकेसह राजलक्ष्मी ज्वेलर्स नामक सराफा दुकानाचे शटर वाकवून चोरी केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरीचा घटनेमुळे व्यापारी व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार विकास वर्मा यांचे मांढळ येथे राजलक्ष्मी ज्वेलर्स नावाने सोन्या चांदीचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी विकास वर्मा यांनी दुकान उघडले तेव्हा त्यांचा नोकर निखील दिघोरे हा दुकानात होता. व ते सोने चांदी खरेदीसाठी नागपूरला निघून गेले. रात्री 7.15 ला नोकराने दुकान बंद करून बॅग व दुकानाचा चाव्या विकास वर्मा यांचा पत्नीकडे दिल्या व त्या घरी परत गेल्या.
शनिवारी सकाळी 6.30 वाजता त्यांना दुकानाचे शटर उघडे असल्याची माहिती मिळाली, दुकानात गेले तेव्हा कुलूप लागलेले होते व खालून शटर वाकलेले होते. आत जाऊन बघितले असता चांदीची पायपट्टी व अंगठी वजन 300 ग्राम किंमत 27000 हजार रुपये आणि सोन्याचे खडे वजन 5 ग्राम, किंमत 35000 असा एकून 62000 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेलेला होता. बाजूला असलेल्या उज्वल निर्मल क्रेडीट को. सोसायटीचे शटर सुद्धा वाकलेले दिसले.
चोरीची माहिती मिळताच कुही पोलीस घटनास्थळी दाखल होत दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून बघितले असता पहाटे 2.30 ते 3.30 दरम्यान चोरी झाल्याचे दिसले. कुही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर करत आहे.


