अवैध मोह्फुल दारू भट्टीवर पोलिसांची धाड
39 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त
कुही:- पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या राजोला शिवारातील कन्हान नदीच्या काठावर अवैध मोहफूल दारुभट्टी सुरु असल्याची गुप्त माहिती वेलतुर पोलिसांना मिळाली.लागलीच पोलिसांनी धाड टाकून आरोपिकडून 39 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील मौजा राजोला शिवारातील कन्हान नदीच्या काठावर अवैध मोहफूल दारुभट्टी सुरु असल्याची गुप्त माहिती वेलतुर पोलिसांना मिळाली. लागलीच वेलतुर पोलिसांनी 31 आक्टोंबर गुरूवारला सापडा रचून धाड टाकली असता एक आरोपी मोहफूल दारू काढताना मिळुन आले.यामध्ये आरोपी रोहित रतन रामटेके (वय 27) रा.लोहारा, जि.भंडारा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपिकडून 1) 340 लिटर मोहाफुल हातभट्टी गावठी दारू अंदाजे किमत 34000/- रू. , 2) 01 लोखंडी ड्रम अंदाजे किंमती 200 रू , 3) 01 जर्मन कटोरा अंदाजे किंमती 150 रू. 4) 04 प्लॉस्टीक पिशवीमध्ये 120 लिटर मोहाफुल सडवा प्रती लिटर 35 रूपये एकुण अंदाजे किंमती 4200 रू, 5) जलावु लाकडे अंदाजे किंमती 500 असा एकूण 39 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करन्यात आलाआहे . सदरची कारवाई वेलतुरचे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विलास करंगामी मनिराम भुरे, संदेश रामटेके अविनाश मस्के यांनी केली असून याचा पुढील तपास वेलतुर पोलीस करीत आहेत.