आधी गळा दाबून आईची हत्या मग वडिलांनाच संपवलं ; इंजिनिअर मुलाने केली जन्मदात्यांची हत्या

आधी गळा दाबून आईची हत्या मग वडिलांनाच संपवलं ; इंजिनिअर मुलाने केली जन्मदात्यांची हत्या

नागपूर :- स्वत:च्या आईवडिलांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. कपिल नगर परिसरातील २५ वर्षीय मुलाने रागाच्या भरात आई वडिलांचा जीव घेतल्याची बाब उघड झाली आहे. या सगळ्य़ा प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. याबाबत नागपूर पोलीसांनी या मुलावर कायदेशीर कारवाई केली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी हत्ये मागचं धक्कादायक कारण उघडकीस आणलं आहे.

नागपुरातील कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीत आई वडिलांची मुलानेच हत्या केल्याची घटना घडली आहे. काल सकाळी डाखुळे पती पत्नीचे घरात मृतदेह आढळून आले. लिलाधर डाखुळे आणि अरुणा डाखुळे अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. या मृददेहामुळे परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान प्रकरणाबाबत पोलिसांनी त्यांच्या मुलाची चौैकशी केली असता सगळा प्रकरा उघडकीस आला. डाखुळे दांपत्यांचा २५ वर्षीय मुलगा उत्कर्ष डाखुळे याची पोलिसांनी चौकशी केली असता त्यानेच त्याच्या आई-वडिलांची हत्या केली, अशी कबुली पोलीसांना दिली. 26 डिसेंबरच्या दुपारी  त्याने आधी गळा दाबून आईची हत्या केली. त्याच संध्याकाळी  वडील घरी आल्यानंतर त्यांना चाकूने मारले. अशी कबुली आरोपीने पोलि्सांना दिली आहे. उत्कर्षला लहान बहिणदेखील आहे. बहिणीला कॉलेजमधून घरी न नेता त्याने त्यांच्या काकांकडे घेऊन गेला. त्य़ानंतर आई बाबा मेडिटेशनसाठी बॅंगलोरला गेले असल्याचं खोटं कारण  त्याने सांगितले. मात्र उत्कर्षचं खोटं फार काळ टिकलं नाही. तापासादरम्यान चौकशीत पोलिसांनी आरोपी उत्कर्ष डाखुळेला त्याचा गुन्हा कबूल करायला लावला. त्यानंतर पोलिसांनी उत्कर्षला बेड्या ठोकल्य़ा आहेत.

·       हत्येचं नेमकं कारण काय ?

उत्कर्ष गेले 6 वर्षापासून इंजिनीअरिंग करत होता. मात्र या 6 वर्षात त्याचे पेपर बॅकलॉक राहत होते. उत्कर्षने इंजिनीअरींग सोडून दुसरं क्षेत्र निवडावं असं त्याचे आई वडिल त्याला कायम सांगत होते. मात्र पालकांच्या सततच्या सल्ला देण्यामुळे उत्कर्षने रागाच्या भरात जन्मदात्या आई वडिलांना संपवलं. याचा कबुली जबाब त्याने पोलीसांना दिला आहे. सदर प्रकरणावर नागपूर पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर पोलीसांच्या मते, रात्री दोनच्या सुमारास नागपूर पोलिसांना खुनाबाबत फोन आला आणि त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. उत्कर्षचे मृत वडिल हे टेक्निशिअन होते तर आई अरुणा डाखुळे प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. या सदर हत्याकांडाने नागपूर आणि परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.