घरबसल्या असे बनवा E-Shram Card, दरमहा मिळेल 3000 रुपयांची पेन्शन.

घरबसल्या असे बनवा E-Shram Card, दरमहा मिळेल 3000 रुपयांची पेन्शन

E-Shram Card: सरकारने कामगार वर्गासाठी नवी पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी कोणताही कामगार ऑफलाइन अथवा ऑनलाईन अप्लाय करू शकतो. यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स, फायदे आणि ऑनलाईन प्रोसेस असे सर्व तपशील जाणून घ्या.

सरकारने कामगार वर्गासाठी पेन्शन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत प्रत्येक मजुराला 60 वर्षांनंतर 3000 रुपये पेन्शन दिली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई-श्रम योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन प्रोसेसच्या मदतीने आपल्या फोन अथवा लॅपटॉपवरून हे ई-श्रम कार्ड बनवून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला पेन्शनसोबतच इतर अनेक सरकारी योजनांचा लाभ कामगारांना मिळू शकतो. याचे फायदे आणि बनवण्यासाठीही ऑनलाईन प्रोसेस जाणून घेऊया.

काय आहे E-Shram Card?

ई-श्रम कार्डद्वारे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची ओळख करून त्यांना विमा संरक्षणासह मंथली पेन्शनची सुविधा उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. याअंतर्गत प्रत्येक कामगाराला एक युनिक डिजिटल कार्ड दिले जाते.

E-Shram Card अप्लाय करण्याची वयोमर्यादा?

भारतातील कोणताही कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतो. त्याच्या अर्जासाठी वय 16 ते 59 वर्षे आहे. ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे, ज्या अंतर्गत कामगारांना नोंदणी करावी लागेल. यामध्ये Ola-Uber, Amazon, Flipkart च्या प्लॅटफॉर्म कामगारांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

कसे बनवता येईल?

तुम्ही हे कार्ड हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींद्वारे बनवून घेऊ शकता, परंतु आम्ही तुम्हाला ऑनलाइन मोडद्वारे ई-श्रम कार्ड कसे बनवायचे याची माहिती देतो. सेल्समन, हेल्पर, ऑटो ड्रायव्हर यासह अनेक कामगार श्रेणीतील लोक ई-श्रम कार्डचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी तुम्हाला https://findmycsc.nic.in/csc/ या साइटला भेट द्यावी लागेल. इथे तुम्हाला याबाबत सर्व माहिती मिळून जाईल.

ऑनलाईन प्रोसेस

  • यासाठी प्रथम ई-श्रम पोर्टलला भेट द्या (https://eshram.gov.in/)
  • होम पेजवर REGISTER on eShram पर्यायावर वर क्लिक करा
  • यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल
  • EPFO, ESIC च्या सक्रिय सदस्याच्या माहितीमध्ये तुम्हाला YES किंवा NO या पर्यायामध्ये उत्तर द्यावे लागेल
  • यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल
  • त्यानंतर तुम्हाला पत्ता आणि शैक्षणिक माहिती द्यावी लागेल
  • कौशल्याचे नाव, व्यवसायाचा प्रकार, कामाचा प्रकार निवडा
  • बँक डिटेल्स एंटर करा आणि self-declaration पर्याय निवडा
  • यानंतर ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
  • मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. OTP एंटर करा आणि ‘Verify’ बटणावर क्लिक करा. यानंतर ई-
  • ई-श्रमकार्ड तयार होईल, जे डाउनलोड करता येईल
  • E-Shram Card बनवण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स?
  • यासाठी मोबाईल क्रमांकाशी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे, अथवा तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे येणार नाहीत
    कायदेशीर बँक खाते क्रमांक असणे गरजचे
  • E-Shram Card चे फायदे?
  • प्रधानमंत्री मानधन योजनेंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन दिली जाईल. तुम्ही अंशतः अपंग असाल, तर तुम्हाला 1,00,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच यात 2,00,000 रुपयांचा डेथ इंशाॅरंस देखील दिला जातो.