३५ वर्षीय महिलेवर नराधमाचा अत्याचार
पसार आरोपी पोलिसांच्या अटकेत
कुही :- पोलीस स्टेशन हद्दीतील हळदगाव येथे एका महिलेवर सकाळच्या सुमारास घरी व शेजारी कोणीही नसल्याचा मागमूस घेऊन एका नराधमाने घरात घुसून महिलेवर अत्याचार केला व पसार झाला.
कुही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,परप्रांतीय मजुरीचे काम करणारे पिडीतेचे पती मध्यप्रदेश येथील असून हल्ली आपल्या कुटूंबियासह मु.हळदगाव ता.उमरेड येथे राहत असून जवळच एका गिट्टीखदानवर ट्रक चालकाचे काम करतात.त्याच्या कुटूंबात पत्नी व दोन मुले आहेत.घटनेच्या दिवशी सोमवार,दि.३० सप्टेंबर ला सकाळी साडेदहा ते अकरा वाजताच्या दरम्यान पीडिता आपल्या पतीसोबत घरी होती.पती जेवण करीत असताना एक अनोळखी इसम घरासमोर येऊन संतोष नावाच्या इसमाचा पत्ता विचारीत होता. पिडीतेच्या पतीने येथे कोणी संतोष राहत नाही,असे सांगितले.व त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव सागर,रा.मकरधोकडा असे सांगत मला संतोष सोबत काम आहे असे सांगित निघून गेला.यानंतर पिडीतेचा पती जेवण करून कामावर निघून गेला.काही वेळानंतर सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान पुन्हा तोच माणूस परत घरी आला तेव्हा पिडीताने आपल्या पतीला खाली बसून मोबाईलवर फोन लावीत होती. तेवढ्यात आरोपीने पिडीतेच्या हातातील मोबाईल फोन हिसकावत बाजूला असलेल्या शिलाई मशीनवर ठेवला व पिडीतेवर जबरन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता पिडीतेने प्रतिकार करत स्वसंरक्षणासाठी आरोपीवर पावशीने वार करण्याच्या प्रयत्न केला. मात्र आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत पिडीतेवर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने आपली दुचाकी घेऊन तेथून पळ काढला. लागलीच पिडितेणे घडलेल्या घटनेबद्दल माहिती पतीला दिली. पिडीतेच्या पतीने आरोपीला गावातील चौकात अडविले.त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यासोबत मारपीट झाली यात आरोपीने मोटारसायकल तेथेच टाकून पळ काढला. पिडीतेच्या तक्रारीवरून कुही पोलिसांनी आरोपीविरुद्ध अप क्र.५०२/२०२४ कलम ६४(१),३३२(ब),३५१(२),बि.एन.एस.नुसार गुन्हा नोंद केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी माहिती मिळताच दोन तपास पथक नेमून आरोपीचा शोध घेऊन अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मा.पोलीस अधीक्षक व एसडीपीओ उमरेड वृष्टी जैन यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर सह उपपोनि मनोहर गभने करीत आहे.