ट्रॅक्टरखाली दबून मजूराचा मृत्यू  ; पेट्रोलपंप/ठाणा येथे महामार्गावरील घटना

ट्रॅक्टरखाली दबून मजूराचा मृत्यू 

पेट्रोलपंप/ठाणा येथे महामार्गावरील घटना

भंडारा : जिल्ह्यातील पेट्रोलपंप/ठाणा येथे सकाळी ७ वाजेच्या सुमारास नागपूरकडून पेट्रोलपंप/ठाणा कडे येणार्‍या मानवता हायस्कूल समोरील सर्व्हिस रोडवर, स्पीड ब्रेकर वर बॅलन्स बिघडल्याने उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पलटी झाले.

यावेळी ट्रॅक्टर चालक अजय दिलीप रुखवडे हा गंभीर जखमी झाला असून त्याला सामान्य रुग्णालय भंडारा येथे पुढील उपचाराकरीता पाठविण्यात आले आहे तर मजूर जीवन फकीरा उपरीकर (४५) रा.सासरा, ता.साकोली, जि.भंडारा याचा जागीच मृत्यू झाला. माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव बेला येथील साखर कारखान्यात उसाची खेप पोहोचवून भंडार्‍याच्या दिशेने परत येत असताना सकाळी नाश्ता करण्यासाठी पेट्रोलपंप/ठाणा च्या दिशेने ट्रॅक्टर चालक निघाला होता पण दुर्दैवाने सर्व्हीस रोडवर अपघात झाल्यामुळे यात मजुराचा मृत्यू झाल्याने सासरा गावात हळहळ व्यक्त केले जात आहे. अपघाताचा तपास जवाहरनगर पोलिस स्टेशनचे पीएसआय पुरुषोत्तम राठोड करीत आहे.