कोरोनानंतर आता आणखी एका महामारीने काढले डोके वर
चीनमध्ये ‘त्या’ व्हायरसने माजवला हाहाकार
बीजिंग : मागील पाच वर्षांपूर्वी चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरसमुळे मोठा हाहाकार उडाला होता. चीनमधून उगम पावलेल्या कोरोना लाटेमुळे झालेला विध्वंस जगाने पाहिला आहे. कोरोनाने केवळ चीनमध्येच नाही तर जगभरात हाहाकार माजवला होता. चीनच्या वुहान शहरातील कोरोनाचे रहस्य आजही कायम आहे. कोरोना महामारीला पाच वर्षे झाली आहेत. दरम्यान, चीनमध्ये विनाशाची आणखी एक लाट उसळताना दिसत आहे.

कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एका रहस्यमय विषाणूचा तडाखा बसला आहे. ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) चा प्रादुर्भाव चीनमध्ये पसरत आहे. त्यामुळे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारखे लाट पाहायला मिळत आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी असते. स्मशानभूमीही तुडुंब भरली आहेत. हा नवीन व्हायरस HMPV वेगाने पसरत असल्याचा दावा अनेक अहवाल आणि सोशल मीडिया पोस्ट्समध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, चीनवर लक्ष ठेवणारे काही लोकांच्या माहितीनुसार, रुग्णालये आणि स्मशानभूमी आता भरली आहेत. लोक या विषाणूला झपाट्याने बळी पडत आहेत. ऑनलाइन शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये हॉस्पिटलमध्ये गर्दी दिसत आहे. चीनमध्ये HMPV, इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-19 सह अनेक विषाणू एकाच वेळी पसरत आहेत. चीन पूर्ण अलर्ट मोडवर आहे. मात्र, या विषाणूबाबत अधिक माहिती दिली गेली नाही.
चीनमध्ये पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती
चीन सध्या मानवी मेटापन्यूमोव्हायरसने पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. HMPV मध्ये फ्लू सारखी लक्षणे दिसतात. त्याची लक्षणे देखील कोविड-19 सारखीच आहेत. सध्या चीन उद्धवस्त होताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
‘SARS-CoV-2 (Covid-19)’ नावाच्या एक्स-हँडलनुसार, इन्फ्लूएंझा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-19 यासह अनेक विषाणू चीनमध्ये एकाच वेळी पसरत आहेत. त्यामुळे रुग्णालये आणि स्मशानभूमी पूर्णपणे भरली आहेत. मुलांची रुग्णालये विशेषत: न्यूमोनिया आणि ‘पांढऱ्या फुफ्फुसाच्या’ वाढत्या प्रकरणांमुळे रुग्णालयात गर्दी होत असल्याची परिस्थिती आहे.



