तारणा येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

तारणा येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

कुही : गट ग्राम पंचायत तारणा येथे भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या, भारतीय स्त्रीवादाच्या जननी, क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रथमतः सावित्री बाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलीत करून अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या महिला शिक्षिका असून महान समाजसेविका व स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या होत्या असे विचार सरपंच पराग तळेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला ग्रा.प.सदस्य सुरज तांबे, ग्रामपंचायत अधिकारी शोभा भोजने, पोलीस पाटील रिता गायकवाड, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक बावनगडे, परिचारीका मंदा कांबळे, दिपाली खानोरकर, रजनी मुनघाटे, वर्षा मोहनकर, विजकन्या दिघोरे, दुर्गा आशा, राजू मेंढे, दिनेश तळेकर, सुनील आंबिलकर, मनोज देवतळे, जितेश दोरखंडे, खुशाल कुलकुले, मुरली मलवंडे, माला खोकले, योगेश तळेकर व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.