खुर्सापार येथे मारहाण : तरुणाच्या नाकाला गंभीर दुखापत ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

खुर्सापार येथे मारहाण : तरुणाच्या नाकाला गंभीर दुखापत ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

कुही :- तालुक्यातील मौजा खुर्सापार येथे वादातून मारहाणीची घटना घडली असून, या प्रकरणी वेलतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 30 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 ते 8.30 वाजेदरम्यान, फिर्यादी निलेश मारोती कुकडे (वय 27, रा. खुर्सापार) यांच्या वडिलांसोबत आरोपी प्रकाश केशव बांते (वय 25, रा. खुर्सापार) याचा वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपी हा फिर्यादीच्या वडिलांच्या अंगावर धावून गेला. हे पाहून निलेश कुकडे हे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्या नाकावर ठोसा मारला, यात फिर्यादीच्या नाकाला गंभीर दुखापत झाली.

फिर्यादीचा तोंडी रिपोर्ट व वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलीस स्टेशन वेलतूर येथे अप क्र. 01/2025, कलम 117(2), 352 भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मनिराम भुरे करीत आहेत.