कुही तालुक्यात अवैध जुगार सट्ट्यावर पोलिसांची धडक कारवाई

कुही तालुक्यात अवैध जुगार सट्ट्यावर पोलिसांची धडक कारवाई

कुही :- तालुक्यात अवैध जुगार सट्ट्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत वरली मटका सट्टा उघडकीस आणला आहे. पोलीस स्टेशन कुही अंतर्गत बाजार चौक कुही, चांपा परिसर तसेच मांढळ येथे सट्टा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकले.

छाप्यादरम्यान कागदावर मटक्याचे आकडे लिहून सट्टापट्टी चालवली जात असल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी सट्टापट्टीचे साहित्य तसेच रोख रक्कम जप्त केली. या कारवाईत तालुक्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध जुगार सुरू असल्याचे निष्पन्न झाले असून संबंधित व्यक्तींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे सोळाशे रुपयांपर्यंत असून, या प्रकरणाचा पुढील तपास कुही पोलीस करीत आहेत. अवैध सट्ट्यावर कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे कुही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.