अज्ञात वाहनाची दुचाकीला जबर धडक ; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

अज्ञात वाहनाची दुचाकीला जबर धडक 

एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

कुही:- मित्रासोबत कामानिमित्त नागपूरला जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

कुही तालुक्यातील चन्ना येथील रहिवासी अमित वसंता गायकवाड (वय 28) हा त्याच्या एमएच 31 बीएफ 5834 या हिरो स्प्लेडर या दुचाकी वाहनाने पचखेडी येथून मित्र अंकित छत्रपती डहाके (वय-19) रा.पचखेडी ह्याला सोबत घेऊन काही कामानिमित्त नागपूर येथे जात होता. दरम्यान दुपारी १२.३० च्या दरम्यान डोंगरगाव नजीक पवन बार जवळ कुही-नागपूर रोड वर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर   जखमी झाले. लागलीच त्यांना नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी अमित वसंता गायकवाड (28)रा. चन्ना याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर या अपघातात अंकित डहाके हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय मेडिकल कॉलेज, नागपूर येथे उपचार सुरू आहे.