Ladki Baheen Yojna: आंगणवाडी सेविका करणार लाडक्या बहिणींची पडताळणी; ‘या’ गोष्टी आढळल्यास लाभ रद्द होणार
सरकारने निवडणुकीत दिलेले 2100 रुपयांचे आश्वासन लागू करतांना तिजोरीवर अतिरिक्त बोजा न पडावा, यासाठी सरकारमध्ये खबरदारी घेण्यावर चर्चा सुरू आहे.
राज्यातील लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत महिला लाभार्थ्यांची संख्या सुमारे अडीच कोटीपर्यंत पोहोचली आहे. परंतु, काही महिलांना निर्धारित निकषांची पूर्तता करत नसल्याने त्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. महिला आणि बालकल्याण विभागाने अशा महिलांना योजनेतून वगळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. योजनेचे खरे लाभार्थीच लाभ घेऊ शकतील आणि सरकारने निवडणुकीत दिलेले 2100 रुपयांचे आश्वासन लागू करतांना तिजोरीवर अतिरिक्त बोजा न पडावा, यासाठी सरकारमध्ये खबरदारी घेण्यावर चर्चा सुरू आहे.

यासाठी, अंगणवाडी सेविका घराघरात जाऊन पडताळणी करणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या घरात चारचाकी वाहन असल्यास, त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. आजपासून (4 फेब्रुवारी) अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरी जाऊन तपासणी करतील. जर चारचाकी वाहन तुमच्या कुटुंबाच्या नावावर आढळले, तर तुम्हाला थेट अपात्र ठरवले जाईल.



