बारावीचा निकाल सोमवार दि. ५ मे ला ; दुपारी १ वाजता होणार ऑनलाईन जाहीर
नागपूर : यंदा शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावीच्या परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या. परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर लागेल असे, शिक्षण मंडळाकडून आधीच जाहीर करण्यात आले होते
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जारी पत्रकात फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल सोमवार, दि. ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बारावीचा निकाल हे तीन वेबसाइट्सवर पाहता येईल
निकाल कसा पाहाल ?
– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा (HSC) निकाल पाहण्यासाठी लिंक दिसेल.
– त्या लिंकवर क्लिक करा.
– एक नवीन पेज ओपन होईल, त्यात तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
– नंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
– तुम्हाला निकाल लगेच दिसेल. त्याचा प्रिंटआऊट काढू शकता किंवा डाउनलोड सुद्धा करू शकता.


