वाघाने केली गाईची शिकार ; परिसरात भीतीचे वातावरण
कुही :- तालुक्यात खरबी, खोबना शिवारासह चितापूर, भामेवाडा , चनोडा आदी गावांसह लगतच्या गावांत गत महिन्याभरापासून वाघाचा वावर असून काही ठिकाणी वन्यप्रान्यांसह पाळीव प्राण्यांची शिकार वाघाने केली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास जंगलात चरायला नेलेल्या गाईवर झडप टाकून वाघाने शिकार केली आहे.
सुनील अंबादास गायधने, रा. खरबी हे आपल्या पाळीव जनावरांना चरण्यासाठी जंगलात घेऊन गेले होते. दरम्यान वाघाने एका गाईवर झडप घालून तिची शिकार केली आहे. यात गाई मालकाचे ३५ हजारांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने लवकरात लवकर लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी साळवा ग्रामपंचायत सदस्य राजेश गायधने यांच्यासह खरबी वासियांनी केली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी दाखल होत मोक्याचा पंचनामा करत ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.विशेष म्हणजे दोन दिवसांआधी (दि.१ सप्टेंबर) येथिलच महादेव गायधने यांच्या सुद्धा कालवटीची शिकार केली आहे. परिसरात दिवसागणिक वाघाचा वाढता वावर पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागातर्फे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे




