भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात भुकंपाचे सौम्य झटके
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात भुकंपाचे सौम्य झटके जाणवल्याची माहिती समोर आली आहे.
तेलंगणा राज्यातील मुलुगू हे भुकंपाचे केंद्र असून भूकंपाची तीव्रता 5.3 किश्टर स्केल असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) याबाबत माहिती देण्यात आली आहे. भुकंपाचे झटके सौम्य असल्याने या जिल्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




