मुख्यमंत्री फडणवीस होणार
कोअर कमिटीच्या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब
राज्यात विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. तर आज विधानभवनात भाजपची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस होणार हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान आज विधानभवनात भाजपच्या गटनेत्याची निवड प्रक्रिया पार पडली. त्याआधी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर केंद्रिय निरीक्षक विजय रूपाणी आणि निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वात कोअर कमिटीची बैठक पार पडली. कोअर कमिटीच्या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.



