नागपूर-नागभीड या नव्या ब्रॉंडगेज लाईनसाठी नागपूर-नागभीड सुरू असलेली इंग्रजकालीन रेल्वे कोरोनाच्या आधीपासून बंद करण्यात आली आहे. नागपूर ते उमरेड पर्यंतचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी पुढे रेल्वे ट्रॅक वनक्षेत्रातुन जात असल्याने काम प्रभावित झाले होते.मात्र आता वनविभागाने ग्रीन सिग्नल दिल्याने पुन्हा या कामाला गती आल्याचे समजते.
नागपूर : जवळपास दीड रखडलेल्या दशकापासून गडचिरोली – वडसा रेल्वे मार्गातील सर्व अडचणी दूर झाल्या असून, रेल्वे एक अंथरण्यासाठी वन विभागाने ग्रीन सिग्नल दिला आहे. याशिवाय इतवारी- वडसा रेल्वे मार्गावरील बांधकाम गतीने सुरू आहे. या रेल्वे ट्रॅकचे काम महारेलकडून करण्यात येत असून इतवारी ते उमरेडचे काम पूर्ण झाले असले तरी उमरेड ते वडसादरम्यान काम सुरू आहे.
मात्र, या मार्गाचे महत्त्व समजून रेल्वे इतवारी स्थानकाच्या दक्षिण भागात ३ नवीन प्लॅटफॉर्म बांधले जात आहे. तिकीट कार्यालय आदींसाठी नवीन इमारतही बांधण्यात आली आहे. लवकरच हा मार्गही पूर्ण होईल, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. जवळपास दीड दशकापासून रखडलेल्या गडचिरोली वडसा रेल्वे मार्गातील सर्व अडचणी दूर झाल्या असून, रेल्वे ट्रॅक अंथरण्यासाठी वन विभागाने ग्रीन सिग्नल दिला आहे. प्राप्त माहितीनुसार, ५२.८ किमी लांबीच्या रेल्वे ट्रॅकपैकी निम्मा मार्ग वनक्षेत्रातून जातो. रेल्वेने एलिव्हेटेड ट्रॅक बांधल्यास वन्यप्राण्यांना जंगलात सहज वावरता येईल, अशी वनविभागाची इच्छा होती. परंतु हा पर्याय खर्चाच्या दृष्टीने महागडा ठरत होता.




