ग्रीफिन प्ले व तथास्तु पब्लिक स्कुल येथील वार्षिक क्रीडा महोत्सव कार्यक्रम संपन्न
कुही:- शहरातील नावलौकिक ग्रीफिन प्ले व तथास्तु पब्लिक स्कुल येथे आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वव्यापी शाळा वेलतुरचे मुख्याध्यापक सुनील जुवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक निखिल येळणे, पत्रकार निखिल खराबे,संचालक राकेश येळणे,सामाजिक कार्यकर्ते मनोज मेश्राम,नगरसेविका नेहा मनसारे,मंगेश बावनकुळे आदी उपस्थित होते. नुकतेच शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबातून आपल्या जिद्द व चिकाटीने तलाठी म्हणून निवड झालेल्या निशा बावनकुळे व राज्य राखीव पोलीस दलात निवड झालेल्या आकाश मांढरे यांचा मुख्याध्यापक मनोज मनसारे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बाळ कलाकारांनी रिमिक्स डान्स,लावणी,गोंधळ सह विविध गाण्यांवर एकल व सामूहिक नृत्य सदर करून उपस्थितांचे मन जिंकले. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विद्यार्थी व पालकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका चकोले यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका येळणे यांनी मानले.



