Maharashtra CM Oath Ceremony; “मी देवेंद्र सविता गंगाधर फडणवीस…”
देवेंद्र फडणविसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
मुंबई :- “मी देवेंद्र गंगाधर फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो की….” आवाज घुमला आणि आझाद मैदानात जल्लोषाचा एकच आवाज झाला. देवेंद्र फडणवीसांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या पाच वर्षांपासून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देवेंद्र फडणवीसांचे चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते. तो क्षण अखेर सत्त्यात उतरला. संपूर्ण आझाद मैदानात जमलेले लोक स्तब्ध होऊन फडणवीसांचा शपथविधी पाहत होते. अखेर महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा भव्यदिव्य शपथविधी पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज (5 डिसेंबर) महराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथविधी कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर आझाद मैदानावर महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

महायुतीच्या शपथविधीसाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून महायुतीच्या शपथविधीची तयारी सुरू झाली होती. अनेक ऐतिहासिक घटनाचा साक्षीदार असलेल्या आझाद मैदानावर महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आयोजित कऱण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज नेते यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते. इतकेच नव्हे तर, बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान, सलमान खान, संजय दत्त, अभिनेत्री माधुरी दिक्षित यादेखील या सोहळ्यासाठी दाखल झाला होता. शपथविधीसाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आईचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांना त्यांच्या आईने औक्षण करून टिळा लावला अन् आशीर्वाद दिले.



