सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ

सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ

शासनाने दि. 1 जुलै, 2004 आदेशान्वये मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 च्या कलम 9 च्या खंड (अ) चा वापर करुन लोकहितास्तव जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालयासमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारणी करण्यात येणारे मुद्रांक शुल्क माफ केले आहे.

अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे, शैक्षणिक संस्था व इतर कार्यालयांमध्ये जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येणाऱ्या नागरिक व विद्यार्थ्यांकडून केलेल्या अर्जासोबत तसेच शासकीय कार्यालये व न्यायालयासमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर 100 रुपये ते 500 रुपये पर्यंतच्या रकमेचे मुद्रांक शुल्क लावलेल्या प्रतिज्ञापत्राची शासकीय अधिकारी तसेच त्यांच्या अधिनस्त कार्यालयाकडून मागणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्य शासनाच्या वरील आदेशानुसार सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांवर आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क माफ केले असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिक व विद्यार्थ्यांकडून विविध प्रमाणपत्रासाठी मुद्रांक लावलेले प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मागणी करु नये अथवा आग्रह धरु नये, असे जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांना देऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना शासनातर्फ़े देण्यात आल्या आहेत.