शुल्लक कारणावरून ग्रामसेवकास मारहाण ; वेलतूर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल

शुल्लक कारणावरून ग्रामसेवकास मारहाण 

 वेलतूर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल

 

कुही :- वेलतुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गट ग्रामपंचायत किन्ही येथे  शुल्लक कारणावरून  ग्रामसेवकास  मारहाण करण्यात आली आहे. ग्रामसेवक याच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध वेलतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांनी दिलेल्या  तक्रारीनुसार  दि.शुक्रवारी (दि.०४)   किन्ही येथील ग्रामस्थ राजेंद्र चिंतामण गोळे नामक व्यक्ती रहिवासी  दाखला घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेला होता. तेव्हा ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत ग्रामसेवक भाऊराव शामराव दोडके यांनी रहिवासी दाखला ऑपरेटर आल्यानंतर ऑनलाईन काढून देतो मात्र आधी  ग्रामपंचायत चे थकीत कर भरा असे गोळे यांना सांगितले. यावर राजेंद्र गोळे याने चक्क ग्रामसेवक यांनाच उलट बोलत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ग्रामसेवक दोडके यांनी गोळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही चक्क ग्रामसेवक दोडके  यांची कॉलर पकडून धक्का देऊ लागला.व काही वेळातच जीवेमारण्याची धमकी दिली. परिणामी काही लोकांनी गोळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळातच  गोळे यांनी शिवीगाळ करत हातातील दगड ग्रामसेवक यांचेवर फेकून मारला. यात गोळे यांनी मारलेला दगड ग्रामसेवक दोडके यांच्या हाताला लागून त्यांना गंभीर दुखापत झाली. ग्रामसेवक भाऊराव दोडके यांचे तक्रारीवरून वेलतूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये वेलतूर पोलीस ठाण्यात आरोपी राजेंद्र गोळे यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.