अवघ्या एका दिवसात त्या अनोळखी प्रेताची ओळख पटवली
कुही पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
कुही :- शहरातील जुन्या बसस्थानकाच्या मागच्या बाजूस लुटे भवनजवळ एका अनोळखी इसमाचे प्रेत मिळुन आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र सदर व्यक्ती कुणाच्याच ओळखीची नसून मुख्य वास्त्यव्याची काहीच माहिती उपलब्ध नसताना आपली तपासयंत्रे फिरवत मृत व्यक्तीची ओळख पटवली.
शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास एक अनोळखी इसम दारू पित व शेंगदाने खातानी दिसला व थोडयाच वेळात तो खाली झोपला.काही वेळातच लोकाची गर्दी जमली.तेव्हा नागरिकांनी त्याचा श्वास सुरू असल्याने लागलीच उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय कुही येथे दाखल केले.परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला तपासुन मृत घोषीत केले. त्याचे वय अंदाजे ५५ते ६०वर्ष असुन सदर इसम हा फिट येवुन मरण पावला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र सदर मृत इसमाची काहीच ओळख मिळून आली नाही. शिवाय परिसरात सर्वत्र शोध घेऊन विचारपूस करूनही सदर इसमाच्या ओळखीबाबत कुणाला काहीच पत्ता लागला नाही. या प्रकरणाचा तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी एएसआय चांगदेव कुथे यांच्याकडे सोपविला.
कुथे यांनी सुरवातीला सदर कोणत्या मार्गे शहरात आला त्या रस्त्यांची पाहणी केली. व त्या मार्गाने तपास सुरु केला असता एका व्यक्तीने त्याला टाकळी मार्गाने येताना पाहिले होते. मात्र टाकळी येथे विचारपूस केली असता तो कुणाच्याच ओळखीचा नसल्याचे कळले. त्यात त्या मार्गावर काही फार्म हाउस होते. कुथे यांनी फार्म हाउस वर जाऊन चौकशी केली असता परसोडी पांदन रस्त्यावर एक फार्म हाउस वर टाळे दिसून आले. सदर फार्म हाउस मालकाला संपर्क करून विचारपूस केली असता तेथील काम करणारा शेतगडी 2 दिवसांपासून गायब असल्याचे कळले. पोलिसांनी फार्म हाउसवरील गायब शेतगड्याच्या घरच्यांसोबत संपर्क साधून त्यांना बोलावून घेत ओळख पटविण्यास सांगितले. तेव्हा सदर इसमाची ओळख पटवून हा त्याचा वडील असल्याचे त्याने सांगितले. सदर इसम हा सुरेश कवडू भोयर रा. गांगापूर असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शवविच्छेदन करून प्रेत अभिषेक सुरेश भोयर याच्या ताब्यात दिले.