अन त्या अपघातातील आरोपीने वेलतूर हद्दीतही मारली होती दुचाकीला कट
वेलतूर पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
कुही : चिपडी जवळ दुचाकीस धडक देऊन कुटूंब उध्वस्त करणाऱ्या आरोपीचा पुन्हा एक गुन्हा उघडकीस आला आहे.त्याने त्याच दिवशी आंभोरा येथून निघाल्यानंतर मेंढा गावाजवळ एका बाईक स्वारास कट मारून पळाल्याने त्यांना जखमी व्हावे लागले.यासंबंधी वेलतुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मांढळ वरून कुही कडे पुढे वडोदा येथे दुचाकीने जात असताना चिपडी जवळ रविवारी ८:१५ ते ९ वाजताच्या दरम्यान मद्यधुंद असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अनियंत्रित कारने समोर जात असलेल्या दुचाकी ला उडविले.यात निलम दिनेश रामटेके नामक महिलेचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा तन्मय दिनेश रामटेके (१२)याच्या मेंदूला जबर मार बसला असून तो अजूनही कोमात आहे.तर तिची मुलगी कु.तनु दिनेश रामटेके(१४) हिची कंबर तुटली असून ती वारंवार बेशुद्ध पडत असते.अशी माहिती आहे.यामुळे रामटेके यांचे संपूर्ण कुटूंब उध्वस्त झाले आहे. एका मद्यधुंद पोलीस शिपायाच्या हातून असा मस्तवाल प्रकारचा गुन्हा घडून दुसऱयाना इजा पोहोचणाऱ्या गुन्हेगारास कडक शिक्षा झाली पाहिजे. चिपडी जवळील अपघाता अगोदर यातील आरोपी अरुण साहेबराब बहाळे (३०,रा.नागपूर) यांनी आंभोरा येथून कर्तव्य आटोपून परत जात असताना आपल्या एम एच -४०/ए सी ३७१५ क्रमांकाच्या कारने मेंढा गावाजवळ कमलेश राजेश्वर नान्हे हे आपल्या कुटूंबियासह आंभोरा दर्शन आटोपून वाहन क्र. एम एच ३१/सी सी ०६४८ क्रमांकाच्या दुचाकी ने पत्नी व चिमुकले दोन मुलांसह जात असताना आरोपी अरुण बहाळे याने त्यांच्या बाईकला कट मारून पळून गेला.यामुळे हे कुटूंब खाली पडून जखमी झाले.किरकोळ जखमी असल्याने वेलतुर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून ते आपल्या गावी परत गेले.यासंबंधी वेलतुर पोलिसांत फिर्यादी मनिराम भुरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला असून भादवी कलम २८१,१२५(अ) व भा.स.न्या १८४,१७७ नुसार गुन्हा तपासात ठेवला आहे.व पुढील तपास ठाणेदार प्रशांत मिसाळे करीत आहे.