राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांत भूकंपाचे धक्के; तब्बल 15 सेकंदांपर्यंत बसला हादरा

राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांत भूकंपाचे धक्के

तब्बल 15 सेकंदांपर्यंत बसला हादरा

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली एनसीआरसह देशातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मंगळवारी सकाळी 6.37 च्या सुमारास हा भूकंप झाला. याशिवाय पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पश्चिम बंगालच्या सिलीगुडी, जलपाईगुडी, कूचबिहारमध्ये हा भूकंप झाला. तर बिहारची राजधानी पाटणा व्यतिरिक्त इतर काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये सकाळी 6.37 वाजता आणि जलपाईगुडीमध्ये सकाळी 6.35 वाजता भूकंपाचे धक्के 15 सेकंद जाणवले. दिल्ली-एनसीआर आणि बिहारसह देशातील अनेक भागात सकाळी पृथ्वी हादरताना दिसली. मंगळवारी पहाटे दिल्ली-एनसीआर, मध्य प्रदेश आणि बिहारच्या पाटणा, मुझफ्फरपूरसह उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंप इतका जोरदार होता की, काही सेकंदांपर्यंत वस्तू हादरू लागल्या. दिल्ली, नोएडा, गाझियाबादसह एनसीआर भागात राहणारे लोक भूकंपाने जागे झाले. भूकंप इतका जोरदार होता की, लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. सध्या कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही.

दिल्ली-एनसीआर आणि बिहार व्यतिरिक्त मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्येही पृथ्वी हादरली आहे. विशेषत: उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सध्या भूकंपाच्या तीव्रतेची माहिती समोर आलेली नाही. या भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, याच्या एक दिवस आधी सोमवारी महाराष्ट्रातील पालघर परिसरात भूकंप झाला होता. त्या भूकंपाची तीव्रता सुमारे 4 रिश्टर स्केल इतकी होती. त्यानंतर आता हा भूकंप झाला आहे.

बिहारच्या पटणामध्ये भूकंपाचे अधिक धक्के

बिहारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोक घराबाहेर पडले. पाटणासह अनेक जिल्ह्यांमध्ये लोकांना हा धक्का अधिक जाणवला. आज सकाळी ६.३८ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी लोक प्रचंड घाबरल्याचे दिसून आले. भूकंपाचे धक्के जाणवताच बहुतांश लोक घराबाहेर पडले. पाटण्यात सुमारे 30 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. पाटणाशिवाय मोतिहारी, मुझफ्फरपूर, सीतामढीसह इतर शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.