कुही पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यासह रक्कम लंपास

कुही पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यासह रक्कम लंपास

 

कुही :- कुही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा चांपा येथे शनिवारी मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत घरफोडी  करून सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली आहे.

थोडक्यात असे की चांपा येथील रहिवासी फिर्यादी तुषार जुगलकिशोर तिवारी (वय 27) रा.चांपा  हे आपल्या आईच्या डोळ्यांच्या उपचारासाठी मागील पंधरा दिवसांपासून परिवारासह नागपूरला नातेवाईकाकडे गेले होते. शनिवारी सायंकाळी ८.३०  दरम्यान घरालगत  असलेल्या मेडिकल चालकाने म्हणून घराकडे पाहिले असता घराचे दरवाजे लागले असून कुलूप लावलेले दिसून आले.  मात्र रविवारी (दि.०७ जुलै) दुपारी 1 वाजताच्या सुमारास तिवारी यांच्या घरच्या गाईला चारा टाकण्यासाठी आलेल्या महिलेला घराचे समोरील दार उघडे दिसले .पण घरात कोणीही  दिसून न  आल्याने तिने फिर्यादी यांना फोन करून माहिती दिली. लागलीच फिर्यादी यांनी घरी येऊन पाहिले असता घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची कुही  पोलिसांना  माहिती देऊन पोलीस घटनास्थळी दाखल होत  तपासणी केली असता चोरट्यांनी घरातील रकमेसह सोने चांदीचा एकूण  1,43,000/-  रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला असल्याचे दिसून आले. वृत्त लिहिस्तोवर  अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती व फिंगर प्रिंट सह डॉग स्काड ला  बोलविण्यात आले होते.  या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास ठमके करीत आहेत.