कुही येथील जेष्ठ अर्जनवीस हरिओम मेश्राम यांचे निधन
कुही :- कुही येथील अधिकृत दस्ताऐवज लेखक तथा अर्जनवीस श्रावण (हरिओम) मेश्राम यांचे आज (बुधवारी) निधन झाले आहे.
कुही तालुक्यातील अग्रणी अर्जनवीस तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे श्रावण (हरिओम) मेश्राम यांची तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर नागपूर येथे खासगी रुग्नालयात उपचार सुरु होता. त्यातच बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली असून आज त्यांची अंत्ययात्रा सांयकाळी ४ वाजता भोजापूर येथील राहत्या घरुन निघून अंत्यविधी त्यांच्या फार्म हाऊस मध्ये होणार आहे.
त्यांच्या जाण्याने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.