पोलीस भरती केंद्रात महिला प्रशिक्षणार्थीला शरीर सुखाची मागणी : ध्वनिफित समाज माध्यमांवर प्रसारित ; केंद्र संचालकाला अटक

पोलीस भरती केंद्रात महिला प्रशिक्षणार्थीला शरीर सुखाची मागणी : ध्वनिफित समाज माध्यमांवर प्रसारित ; केंद्र संचालकाला अटक

भंडारा : पवनी तालुक्यातील अड्याळ येथील हिवरकर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या एका प्रशिक्षणार्थी महिलेसोबत केंद्र संचालक तथा शिक्षक नितेश दामा हिवरकर सोनेगाव (पहेला) याने अश्लील शब्दात जातीवाचक शिवीगाळ देत शरीर सुखाची मागणी केल्याची ध्वनिफीत प्रसारित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

२८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास हिवरकर यांनी या महिलेला दूरध्वनी वरून संपर्क करत जातीयवादी शब्दाचा वापर केला. इतकेच नव्हे तर त्या महिला प्रशिक्षणार्थीला पैशांचे आमिष दाखवून शारीरिक संबंधांची मागणी केली. समाज माध्यमावर ही ध्वनिफीत प्रसारित होताच संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. या प्रकरणी अड्याळ पोलीस स्टेशन येथे नितेश दामा हिवरकर (४०) याच्या विरोधात विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात जातीय तेढ निर्माण करून सामाजिक वातावरण दूषित न करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.