दुचाकीची मिनी ऑईल टँकरला धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

दुचाकीची मिनी ऑईल टँकरला धडक 

एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

कुही :- कुही-उमरेड मार्गावर आपतूर शिवारात  अंत्यविधी आटोपून गावी परत जाणाऱ्या दुचाकीची विरुद्ध दिशेने येणाऱ्या  मिनी ऑईल टँकर सोबत समोरासमोर जबर धडक झाली यात एकाचा अपघातस्थळीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

कुही पोलीस स्टेशन हद्दीतील आपतूर शिवारात कुही-उमरेड मार्गावर मोटारसायकल क्र. एमएच ३४ सीजी ४३५५ या दुचाकीने नितेश प्रभाकर डहारे (वय-३५) रा.बाळापुर, ता.नागभीड, जि.चंद्रपूर  व ढेकलु आगरे (वय-६५) रा.चांदापूर, ता.मुल,जि.चंद्रपूर हे कुही येथून अंत्यविधी आटोपून गावी परत जात असताना विरुद्ध दिशेने उमरेड वरून येणाऱ्या एमएच ३१ एक्सएल ६०१७ क्रमांकाच्या ऑईल टँकर सोबत समोरासमोर जबर धडक झाली. या भीषण अपघातात मोटारसायकल स्वार ढेकलु आगरे (वय-६५) रा.चांदापूर, ता.मुल,जि.चंद्रपूर याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मोटारसायकल चालक नितेश प्रभाकर डहारे हा गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कुही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून याचा पुढील तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुही पोलीस करत आहे.