किरकोळ वाद विकोपाला; रामनगर चौकात दिवसाढवळ्या हत्या, आरोपी फरार

किरकोळ वाद विकोपाला; रामनगर चौकात दिवसाढवळ्या हत्या, आरोपी फरार

नागपूर : शहरातील वर्दळीचा रामनगर चौकात हत्येची घटना घडली आहे. अत्यंत वर्दळीच्या रामनगर चौकात भर दुपारी हत्येची घटना घडल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केलाय.

पुढे आलेल्या माहितीनुसार, विशाल निकोसे असे मृतकाचे नाव असून तो रामनगर चौकात रस्त्याच्या कडेला मेकॅनिक काम करायचा दरम्यान, जवळच भाजीचे दुकान लावणाऱ्या आरोपी सोबत त्याचा गेले अनेक दिवसापासून वाद सुरु होता. आज ही दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्याच्यातूनच हत्येची ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी भाजीवाला फरार झाला आहे. पोलिसांनी हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी रॉड जप्त केली आहे.

घटनास्थळी मोठ्याप्रमाणात रक्त सांडल्याचे दिसून आलं. दुसरीकडे शहरातील अतिशय वर्दळीच्या आणि मुख्य रस्त्यावर भर दुपारी हत्येची घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे.