अंमली पदर्थाची विक्री करणाऱ्या आरोपी विरूध्द गुन्हा नोंद
स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण यांची कारवाई
कुही :- बुधवारी (दि.6 ऑगस्ट) स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण चे पथक पोलीस स्टेशन कुही हद्दीत अवैध धंदयावर कारवाई कामी पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदाराने खात्रीशीर माहीती दिली की, शहरातील वार्ड क्र. १ येथे राहणारी महीला ही अंमली पदार्थ गांजा बाळगुन गांजाची विक्री करत आहे.

मिळालेल्या महीतीच्या आधारे पोलीसांनी घटनास्थळी जावुन सापळा रचुन महीला आरोपी वय ५५ वर्षे, रा. वार्ड क १, कुही जि. नागपुर हिला ताब्यात घेवुन तिची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता नमुद आरोपीचे ताब्यात अंमली पदार्थ गांजा मिळुन आला. पोलीसांनी नमुद आरोपीच्या ताब्यातुन १) ७२८ ग्राम वाजनाचा अंमली पदार्थ गांजा किंमती १४,५६५/–रुपये, १ मोबाईल किमंत १००० /- रूपये असा एकुण १५,५६५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महीला आरोपी यांच्या विरूध्द एन. डी. पी. एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास कुही पोलीस करत आहे.







