विज पडून तिघेजन जखमी ; जखमींना कुही ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नागपूरला रेफर

विज पडून तिघेजन जखमी

जखमींना कुही ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नागपूरला रेफर

कुही:-  मौजा- सोनपुरी येथील शेतशिवारात काम करणाऱ्या महिलेसह दोघे वीज पडल्याने जखमी झाले असून जखमींवर नागपूर येथे उपचार सुरू आहे.

सद्यस्थिती शेतशिवारातील शेतीकामांना गती आली असून खत टाकणी सह निंदन कामाला गती आली असून शेतात शेतकऱ्यांसह मजूर पहावयास मिळतात.शनिवारी (दि.7) सोनपुरी येथील प्रेम ठाकरे यांच्या शेतात मिरची निंदन करण्यासाठी मजूर सांगितले होते. अचानक सायंकाळी 4.30 च्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाल्याने
प्रेम ठाकरे यांच्या शेतातील मजुरांसह आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी लगतच असलेल्या अक्षय ठाकरे यांच्या शेतातील झोपडीत आश्रय घेतला.मात्र दुर्दैवाने तिथेच वीज कोसळल्याने त्यात इंदिरा ठाकरे (60), अक्षय ठाकरे (28), धनराज चांदेकर (60) सर्व रा.सोनपुरी हे जखमी झाले. जखमींना तात्काळ कुही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून प्राथमिक उपचार करत त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे. सुदैवाने ही घटना थोडक्यावर गेली असून मोठा अनर्थ टळला आहे.