अवैध गावठी दारू वाहतूकीवर कारवाई ; रबरी ट्यूब मधून करत होता दारु वाहतूक

अवैध गावठी दारू वाहतूकीवर कारवाई 

रबरी ट्यूब मधून करत होता दारु वाहतूक

कुही :- तालुक्यातील मौजा-मांढळ येथे अवैध गावठी दारूची दुचाकी वाहनाद्वारे वाहतूक करणाऱ्या इसमावर कुही पोलिसांनी कारवाई केली असून आरोपीच्या ताब्यातून  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कुही पोलिसांना विश्वसनीय मुखबिराच्या खात्रीशीर माहितीनुसार माहिती मिळाली कि एक इसम पांढऱ्या रंगाच्या मोपेड वाहनातून दारू वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. लागलीच कुही पोलिसांनी पंचासमक्ष मांढळ ते वडेगाव रोडवर जाऊन थांबत मुखाबिराद्वारे वर्णन सांगीतेली दुचाकी येताना दिसली. पोलिसांनी हाथ दाखवून दुचाकी थांबवण्याच्या ईशारा करूनही दुचाकी चालकाने दुचाकी न थांबवता वेगाने पळवून समोर नेली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत मांढळ पेट्रोलपंप नजीक थांबवून आपला परीचय देत त्याला नाव विचारले असता त्याने शिरीष विजय वाल्देकर (वय-३७) रा. बौद्ध विहार जवळ,अड्याळ,ता.पवनी (जि.भंडारा) असे सांगितले.   त्याचे गाडीवरील नायलॉन चुंगडीची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात  मोहफुलाची गावठी दारू दोन रबरी ट्यूब मध्ये आढळून आली. पोलिसांनी पंचासमक्ष नायलॉन चुंगडीतील 2 रबरी ट्यूब प्रत्येकी २० लिटर प्रमाणे एकूण ४० लिटर गावठी मोहफुल दारू आढळून आली.  प्रती लिटर 50 रुपये प्रमाणे २००० रुपये व दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची मोपेड दुचाकी टी.व्ही.एस. ज्युपिटर क्र. एमएच ३६ एजे ९८९३ किंमत अंदाजे ६० हजार असा एकूण ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  हि कारवाई कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात पोह रोषण नारनवरे यांनी केली असून पुढील तपास पो.ह. सुधीर ज्ञानबोनवार करत आहेत.