आंभोरा पूल चारचाकी सह जड वाहनांसाठी बंद

आंभोरा पूल चारचाकी सह जड वाहनांसाठी बंद

 

कुही:- नागपूर-भंडारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंभोरा येथील पुलावरील वाहतूक काही तासांसाठी बंद करण्यात येणार असून त्या ऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आल्या आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पावसाळयाअगोदर (pre mansoon) च्या निरीक्षण कामासाठी आंभोरा पुलावरील चारचाकी व जड वाहनांसाठी दि.१४ जून २०२४ ला सकाळी ६ ते दुपारी २ वाजता पर्यंत पूल बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत पुलावरून प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.