जीएमके कॉम्प्युटरचे संचालक अरविंद अवचट यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार
कुही :- सन -2023 या वर्षात खरीप व रब्बी हंगामात नागपूर जिल्ह्यात सर्वात जास्त पीक विमा काढल्याबद्दल जीएमके कॉम्प्युटरचे संचालक अरविंद अवचट यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूनी आपल्या शेतातील कापूस, धान, सोयाबिन, तूर आदी पिकांचा पिक विमा १५ जुलै पूर्वी काढून घ्यावा, असे आवाहन कुही तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी राजेश जारोंडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. सन २०२३-२०२४ मध्ये खरीप हंगामात कुही तालुक्यात २५८०८ व रब्बी हंगामात ११४५१ शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता. पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात १६९६६ शेतकऱ्यांना रू. १५८६.३५ लाख व रब्बी हंगामात१३६७ शेतकऱ्यांना रू. १५०.५३ लाख पीक विमा कंपनी तर्फे लाभ सुध्दा देण्यात आला होता. सदर योजनेत पिक विमा काढण्यासाठी तालुक्यातील सर्व CSC सेंटर यांनी खुप चांगले काम केले होते. त्यापैकी कूही येथील जीएमके कम्प्युटर्सचे केंद्र चालक अरविंद अवचट यांनी उल्लेखनीय कार्य करत नागपूर जिल्ह्यात सर्वात जास्त पीक विमा काढले त्याबद्दल ०४ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपुर येथे आयोजित सभेत जिल्हाधिकारी, नागपुर यांचे तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. जिएमके कॉम्पुटरच्या उत्कृष्ट कामाबद्दल कौतुक करण्यात आले. या वर्षी आता फक्त शेवटचे काही दिवस पिक विमा काढण्यासाठी शिल्लक राहिलेले आहे. तरी तालुक्यातील सर्व CSC केंद्र चालक यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे पिक विमा काढावे व शेतकऱ्यांनी सुध्दा आपले पिकांचे पिक विमा काढून घ्यावे असे आवाहन तालुका कृषि अधिकारी, कुही राजेश जारोंडे यांनी केले आहे.




