प्रेमविवाह, नंतर अनेक पुरुषांशी प्रेमसंबंध; नागपुरात महिलेच्या हत्येनंतर वाढला सस्पेन्स

प्रेमविवाह, नंतर अनेक पुरुषांशी प्रेमसंबंध; नागपुरात महिलेच्या हत्येनंतर वाढला सस्पेन्स

 

पैशाच्या वादातून एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.आरोपीने प्रथम महिलेसोबत दारू पिली आणि नंतर तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली. नेमकं काय आहे प्रकरण?

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून एका ३३ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. महिलेच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी महिलेसोबत दारू पियाला त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून हत्या केली. ही घटना नागपूरमधील भाड्याच्या खोलीत घडली. दरम्यान पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. महिलेचे अनेक लोकांशी संबंध असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.

तुटलेले मंगळसूत्र सापडले

याप्रकरणी झोनल डीसीपी रश्मिता राव यांनी पोलिस ठाण्यात १० तासांहून अधिक काळ तपास केला. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा मृतदेह एका खोलीच्या जमिनीवर आढळला. पीडितेच्या उजव्या कानातून रक्त वाहत होते. तसेच कानाच्या खाली जखमांच्या खुणा होत्या. तसेच उशीवर आणि हातावर रक्ताचे डागही आढळले. मृतदेहाजवळ एक तुटलेले मंगळसूत्र आणि एक खराब झालेला स्मार्टफोनही आढळला. ती एक लहान खोली होती, पण बाकी सर्व काही सामान्य होते. हे पाहून पोलिसांना आश्चर्य वाटले.

महिलेचा प्रेमविवाह

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला काही वर्षांपूर्वी तिच्या पती आणि मुलीसह नागपूरला आली होती. तिचा नवरा एका रेस्टॉरंटमध्ये काम करायचा. पीडितेचा प्रेमविवाह झाला होता. मात्र नागपूरला आल्यानंतर महिलेचे अनेक लोकांशी संबंध निर्माण झाले होते. आतापर्यंतच्या तपासात किमान दोन नावे समोर आली आहेत. पतीशिवाय पोलिसांना या लोकांवरही संशय आहे.

आरोपी महिलेच्या घरी वारंवार येत होता

शेवटच्या कॉल डिटेल्सची तपासणी केल्याने पोलिसांना प्रकरण उलगडण्यास मदत झाली. या आधारावर आरोपीला पकडण्यात आले. आरोपी अनेकदा महिलेच्या घरी येत असल्याचे उघड झाले आहे. तिथे दोघेही एकत्र दारू पित असत आणि शारीरिक संबंधही ठेवायचे. तो त्या महिलेला काही पैसे देऊन निघून जायचा. ज्या दिवशी महिलेने जास्त पैसे मागितले त्याच दिवशी महिलेची हत्या केली. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. आरोपीने महिलेवर हल्ला केला आणि नंतर तिचा गळा दाबून हत्या केल्याची माहिती समोर आली.