भरधाव कार नाल्यात पलटली ; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

भरधाव कार नाल्यात पलटली ; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

कुही :-  लग्न समारंभ आटोपून गावी परत जाणाऱ्या  भरधाव कार वरील कारचालकाचे  नियंत्रण सुटल्याने कुही-नागपूर मुख्य मार्गावरील टेंभरी नजीक वळणावर विरुद्ध दिशने जाऊन कार नाल्याच्या पुलाचे कठडे तोडून थेट नाल्यात पडली. यात कारमधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर किरकोळ जखमी झाले आहे.

रविवारी (दि.09) अंदाजे रात्री 10.30 च्या दरम्यान कुही येथून लग्नसमारंभ आटोपून हळदगाव येथे परत जात असताना कुही-नागपूर मार्गावरील टेंभरी नजीक वळणावर भरधाव कार वरील कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन क्र. एम.एच.४७ एओ ०७०२ हि कार रस्त्याच्या विरुद्ध दिशने जाऊन नाल्यावरील लोखंडी सुरक्षा कठडे तोडून थेट नाल्यात पलटली. यात कारमधील 1) चंद्रशेखर ईश्वर ढगे , 2) वेणू मनोहर नारनवरे (वय-४५) ,3)शिवशंकर निकोसे (वय-43),  4)अंतकला राजेंद्र नेवारे (वय-३५) , ५) वैष्णवी राजेंद्र नेवारे(वय-७) ,6) यश हरिश्चंद्र श्रीरामे(वय-6), ७)राजू मारोती छापेकर (वय-५४) , ८)रेखा राजू छापेकर (वय-३५), 9)नैतिक भुरे (वय- 6) सर्व रा. हळदगाव हे जखमी झाले. जखमींना गाडीबाहेर काढत तत्काळ कुही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. व तेथून पुढील उपचारासाठी मेडिकल कॉलेज,नागपूर येथे रेफर करण्यात आले. त्यातील  शिवशंकर निकोसे (वय-४३) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास कुही पोलीस करीत आहे.