मध्यरात्री कुही पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड
तीन आरोपी ताब्यात ; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
कुही :– कुही पोलिसांना मध्यरात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून कुही पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आले असून दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. घटनास्थळावरून तब्बल २ लाख ७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रविवार (१० सप्टें.) पहाटे अडीच वाजताच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिचंद्र इंगोले हे आपल्या चमूसह शासकीय वाहनाने गस्त घालत असताना, पाचगाव येथील सोयाबिन कंपनीच्या मागील लेआउटमधील मोकळ्या जागेत काही इसम ताशपत्त्यावर पैशांची बाजी लावत जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. तत्काळ पाचगाव पोलिस चौकीच्या पथकासह छापा टाकण्यात आला.छापा पडताच काही आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. मात्र 1) धिरज प्रकाश दगडे (वय ३२)रा. नंदनवन, नागपूर, 2)प्रविन विजयराव बोरकर (वय ४३)रा.सेवादल नगर, नागपूर आणि 3)रमेश सुरेश चंदनखेडे (वय ३४) रा.सिंदेवाही,चंद्रपूर यांना घटनास्थळावरच पकडण्यात आले. त्यांच्या अंगझडतीतून व डावावरून २,२४० रुपये रोख रक्कम आणि ५२ ताशपत्ते जप्त करण्यात आले. तसेच घटनास्थळावरून एक होंडा शाईन, तीन हिरो स्प्लेंडर मोटरसायकली असा एकूण सुमारे २ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी कुही पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.ही कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोदार, अपर पोलिस अधीक्षक अनिल मस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या नेतृत्वात एपीआय हरिचंद्र इंगोले, स.फौ. मनोज पाली, पो.शी.आशिष खराबे व सुरज विलायतकर यांच्या पथकाने केली.
महत्वाची टीप:- सदर पोर्टलवरील बातम्या वाचकांसाठी आहेत. बातम्या चोरणाऱ्या स्वयंघोषित पत्रकारांसाठी नाही.


