Nagpur :नागपुरात खळबळ ! रस्ते खोदकामादरम्यान सापडले 4 मानवी सांगाडे
नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरात बेस पॉवर हाऊसजवळ रस्त्याचं काम सुरू होत. रस्त्याचं काम सुरु असतांना जेसीबीने खोदकाम सुरु होत.
नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरात बेस पॉवर हाऊसजवळ रस्त्याचं काम सुरू होत. रस्त्याचं काम सुरु असतांना जेसीबीने खोदकाम सुरु होत. या दरम्यान चार मानवी सांगाडे मिळाले आहेत. हा प्रकार सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे.
चार मानवी सांगाडे सापडल्यानंतर पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. हे सांगाडे नेमके कोणाचे आहे, हे अद्याप समजू शकले नाही आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?
नागपूरच्या उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी खोदकाम सुरु आहे. खोदकाम सुरु असतांना मानवी सांगाडा सापडला. जेसीबीचा पंजा मानवी कवटीला लागले आणि मशीन ऑपरेटरने काम थांबवले. त्यांनंतर सक्करदरा पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलीस इन्स्पेक्टर मुकुंद ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने मोठ्या काळजीपूर्वक बऱ्यापैकी कुजलेल्या अवस्थेत सांगाडा बाहेर काढला. काही आठवड्यापूर्वी पुरण्यात आला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टम करिता पाठविण्यात आलं आहे. उशीरा रात्रीपर्यंत निर्माण कार्यातील कामगार, तसेच परिसरातील रहिवाशांचे जबाब नोंदवून घेण्यात येत होते.


