शेतात वीजेच्या धक्क्याने महिलेचे दोन्ही डोळे निकामी
भंडारा : मोहाडी तालुक्यातील खैरलांजी येथे दि. ९ ऑगस्टला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शेतशिवारात काम करीत असताना अचानक वीज कोसळल्याने महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाल्याची घटना घडली.
खैरलांजी येथील रहिवासी प्रमिला मुकेश पुसाम (४८) ही महिला शेतात काम करत असताना अचानक दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान पावसाची सुरुवात झाली. आभाळात विजांचा कडकडाट सुरू होऊन अचानक महिलेच्या आमोरासमोर वीज कोसळल्याने महिलेचे दोन्ही डोळ्यांना दिसणे बंद झाले. आपल्या डोळ्यांना दिसत नाही, अंधत्व आल्याचे तिला समजताच महिलेने आरडाओरड सुरु केली. घटनेची माहिती गावात कळताच नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व जखमी अवस्थेत महिलेला घरी आणले. गावकर्यांनी घटनेची माहिती पोलीस स्टेशन आंधळगाव यांना दिली. जखमी महिलेला तुमसर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे. जखमी महिलेच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.



