रक्षाबंधनानिमित्य मामाचा गावी जातांना धावत्या रेल्वेतून पडून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

रक्षाबंधनानिमित्य मामाचा गावी जातांना धावत्या रेल्वेतून पडून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

भंडारा : रक्षाबंधनानिमित्त आई-वडीलांसोबत मामाच्या गावी जात असताना अचानक धावत्या रेल्वेतून पडून भंडार्‍यातील तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना पांढूर्णा येथे घडली. गौरव रविंद्र कोलते (४४) असे मृतकाचे नाव आहे. मुलाच्या अपघाती मृत्यूने भावाला राखी बांधण्याचे बहिणीचे स्वप्न भंगले असून कोलते परिवारात शोककळा पसरली आहे.

भंडार्‍यातील प्रसिद्ध अधिवक्ता रविंद्र कोलते यांचा मुलगा गौरव हा क्रिकेट खेळाडू व व्यवसायिक होता. रक्षाबंधनानिमित्त तो आई-वडीलांसोबत मामाच्या गावी इंदोर येथे रेल्वेनी जाण्यास निघाले. रात्री पांढूर्णा परिसरात रेल्वेतून प्रवास करताना रेल्वेतच आई-वडीलांसोबत जेवन करून हात धुण्याच्या प्रयत्नात दरवाजाचा अचानक धक्का लागल्याने गौरव रेल्वेतून पडला.

कुटुंबीयांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारात मुलाचा शोध लागलेला नव्हता. दुसऱ्या दिवशी गौरव याचे प्रेत झुडपात पडल्याचे दिसून आले. गौरवचा अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.