अवैध देशी दारू वाहतूकीवर कारवाई ; दुचाकीने  करत होता अवैधरीत्या  दारुची  वाहतूक

अवैध देशी दारू वाहतूकीवर कारवाई

दुचाकीने  करत होता अवैधरीत्या  दारुची  वाहतूक

कुही :- तालुक्यातील मौजा-मांढळ येथे अवैधरित्या देशी दारू विक्रीसाठी  दुचाकी वाहनाद्वारे वाहतूक करणाऱ्या इसमावर कुही पोलिसांनी कारवाई केली असून आरोपीच्या ताब्यातून दारूसह  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पेट्रोलिंग दरम्यान   कुही पोलिसांना विश्वसनीय मुखबिराच्या खात्रीशीर माहितीनुसार माहिती मिळाली कि एक इसम मोपेड वाहनाद्वारे  वाहनातून दारू वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. लागलीच कुही पोलिसांनी पंचासमक्ष मांढळ ते कुही  रोडवर जाऊन थांबत मुखाबिराद्वारे वर्णन  सांगीतेली दुचाकी येताना दिसली. पोलिसांनी हाथ दाखवून दुचाकी थांबवण्याच्या ईशारा करूनही दुचाकी चालकाने दुचाकी न थांबवता वेगाने पळवून समोर नेली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत वडेगाव रोड नजीक थांबवून आपला परीचय देत त्याला नाव विचारले असता त्याने रितेश गुपचंद राउत  (वय-४५ ) रा.वार्ड क्र.4, कुही  असे सांगितले.   त्याचे गाडीवरील नायलॉन चुंगडीची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात देशी दारूच्या कोकण संत्राच्या निपा आढळून आल्या. पोलिसांनी पंचासमक्ष नायलॉन चुंगडीतील २०० देशी दारूच्या कोकण संत्राच्या ९० एमएलच्या  निपा प्रत्येकी ३५ रुपये प्रमाणे एकूण २०० बाटल्या  दारू आढळून आली असा एकूण ७००० ची दारू   व दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली  मोपेड दुचाकी डीस्तिनी  क्र. एमएच ४०  सिएल  ९९५९  किंमत अंदाजे ४०  हजार असा एकूण ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  हि कारवाई कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात पोह सुधीर ज्ञानबोनवार सह रणजीत मेश्राम यांनी केली आहे.