बामणी (पुनवर्सन) येथे घरफोडी ; १.५५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

बामणी (पुनवर्सन) येथे घरफोडी ; १.५५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

कुही :- पोलीस स्टेशन वेलतूर हद्दीतील बामणी गावात भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. फिर्यादी देवराव रेहपाडे व त्यांचे कुटुंबीय कामानिमित्त गावाबाहेर गेले असता अज्ञात इसमाने त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी केली.

चोरट्यांनी घरातील कपाट फोडून सोन्याचे पदक, सोन्याचे गहू मणी, कानातील सोन्याचे झुमके, सोन्याचे डोरले आदी सोन्याचे दागिने असा एकूण अंदाजे १,५५,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी पोलीस स्टेशन वेलतूर येथे अप. क्र. ०४/२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वेलतुर पोलीस करीत आहेत.