अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द कारवाई ; स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण यांची कामगिरी

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द कारवाई ; स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण यांची कामगिरी

कुही : पोलीस स्टेशन कुही हद्दीत येणाऱ्या मौजा खापरी फाटा, पाचगाव येथे अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

दि.०९/०५/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, ट्रकने अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी मौजा खापरी फाटा, पाचगाव येथे नाकाबंदी केली असता ट्रक क्रमांक एम.एच ४० बीजी ४०८६ हा मिळुन आला. सदर वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यात रेती भरलेली आढळली. पोलिसांनी वाहन चालकाला त्यांचे नाव व पत्ता विचारले असता चालकाने त्याचे नाव लंकेश सुरेद्र तुमसरे, वय २९ वर्षे रा. बहादुरा, नागपुर असल्याचे सांगितले. सदर वाहन चालकाला रेती वाहतुकीच्या परवानाबाबत विचारपुस केली असता त्याचेकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. वाहन मालकाबाबत विचारपुस केली असता सदर वाहन त्याच्याच मालकीचे असल्याबाबत माहीती पोलीसांना दिली.

पोलीसांनी पंचासमक्ष ट्रक क्र. एमएच ४० बीजी ४०८६ किंमती २०,००,००० /- रूपये, ४ ब्रास रेती किंमती २०,००० /- रूपये असा एकुण २०,२०,०००/- रूपयाचा मुददेमाल जप्त केला. आरोपी वाहन चालक / मालक याच्या विरूध्द पोलीस स्टेशन कुही येथे कलम ३०३ (२), ४९ भा.न्या.सं सहकलम ४८ (७), ४८ (८) म ज म सहीता, सहकलम ४,२१ खान खनिज अधिनियम सहकलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी चालक / मालक याला अटक केली आहे.