ईडी, ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून निवृत्त अभियंत्याला २३ लाखांना गंडवले ; ओडिशातून एकाला अटक
नागपूर – तुमच्या खात्यात मनी लॉन्ड्रीगंचा पैसा जमा झाला असून या संदर्भात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. आता लवकरच तुम्हाला अरेस्ट केली जाणार असल्याची धमकी देत, सायबर गुन्हेगारांच्या टोळीने वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड मधील एका निवृत्त मुख्य अभियंत्याला 23 लाख 71 हजार रुपयांनी गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
सायबर पोलिसांनी ओडिसामध्ये छापा टाकून रेल्वे कर्मचाऱ्याला अटक केली आहे. रंजनकुमार विष्णूचरण पटनायक वय 60 असे या प्रकरणी अटकेतील कर्मचाऱ्यांचे नाव आहे. सायबर गुन्हेगारांनी रंजनकुमार यांचे खाते भाड्याने घेतले होते. मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे. या गुन्हेगारांच्या टोळीतील एका महिलेने दोन जुलै रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारात निवृत्त अभियंत्याच्या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधला. आणि या प्रकारची बतावणी केली आणि रिझर्व बँकेचे बनावट दस्तावेज दाखवत त्यांना हा प्रकार खरा वाटावा म्हणून व्हाट्सअपवर पाठविले. अभियंता घाबरला त्याने सायबर गुन्हेगारांनी सांगितलेल्या बँक खात्यात 23 लाख 71 हजार रुपये जमा केले.

विशेष म्हणजे ईडीने अटक करण्याच्या भीतीने हा अभियंता इतका घाबरला की, त्याने मुदत ठेव मोडून 23 लाख रुपयांची रक्कम सायबर गुन्हेगाराच्या खात्यात टाकली. भाड्याने घेतलेल्या रंजन कुमार यांच्या खात्यातील रक्कम जमा करायला लावली. पोलिसांनी आता त्यांच्या खात्यातील 19 लाख 90 हजार रुपयांची रक्कम गोठवली आहे.


