दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
कुही पोलिसांत दाखल
कुही :- कुही पोलीस स्टेशन हद्दीतील अडम शिवारात दुचाकीवरून पतीसह शेतातून घरी परत येत असताना दुचाकीवरून तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार इंदिरा इस्तारी तितरमारे ( वय-50) रा. अडम असे उपचारादरम्यान मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी (10 जानेवारी ) रोजी सायंकाळी ५ वाजता च्या दरम्यान इस्तारी तितरमारे हे त्यांच्या दुचाकी क्र. एमएच ४९ बीएल ०४१६ या वाहनाने खेंडा येथील शेतातून शेतीकामे आटोपून पत्नीसह गावी अडम येथे खेंडा-अडम या कच्चा पांदन रस्त्याने परत येत असताना अडम नजीक देविदास चोकट यांचे शेतानजिक रस्त्यावर गाडीवरून तोल गेल्याने खाली पडल्याने त्यांचा डोक्याला मार लागत त्या गंभीर जखमी झाल्या. लागलीच त्यांना कुही येथील ग्रामीण रुग्नालयात दाखल करत तेथून पुढील उपचारादरम्यान नागपूर येथे रेफर करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला आहे.



