नागपूर: तरुणींना बघून रस्त्यावरच अश्लील कृत्य करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक  

नागपूर: तरुणींना बघून रस्त्यावरच अश्लील कृत्य करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक  

नागपूर : वर्धा मार्गावरील सुशोभिकरण केलेल्या फुटपाथवर बसलेल्या तरुणींना बघून एका युवकाने कानाला मोबाईल लावून अश्लील कृत्य केले. स्वत:ची पँट काढून तरुणींकडे बघून अश्लील इशारे केले. हा किळसवाणा प्रकार धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यवर्ती कारागृहासमोरील रस्त्यावर घडला.

या प्रकरणी धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्या विकृत मानसिकतेच्या युवकाला अटक अटक केली. वर्धा मार्गावरील अजनी चौकाकडून रहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर हा प्रकार घडला आहे. सायंकाळच्या सुमारास फुटपाथवर तरुण-तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक येऊन बसतात. रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास काही तरुणी फुटपाथवर लावलेल्या बेंचवर बसल्या होत्या. अचानक एक युवक त्या तरुणींसमोर आला. त्याने तरुणींनी बघून अश्लील इशारे केले. त्यानंतर त्याने पँट खाली करुन अश्लील कृत्य करायला सुरुवात केली.

या प्रकारामुळे तरुणींना धक्काच बसला. त्याने तरुणींकडे पाहत चुंबन घेण्याचा इशाराही केला. सुरुवातीला त्या तरुणींनी दुर्लक्ष केले. मात्र, एकीने हिंमत दाखवत त्याचा व्हिडिओ काढला. त्यानंतर त्या युवकाला हटकले. मात्र, तो युवक अरेरावी करुन तरुणींना दमदाटी करीस अश्लील संवाद साधत होता. त्यामुळे मुलींनी पोलिसांना फोन लावण्यासाठी काही व्यक्तींची मदत घेतली. काही नागरिक मदतीसाठी आल्यामुळे त्या युवकाने तेथून पलायन केले. धंतोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.